डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने हा गौरवग्रंथ वाचकांच्या समोर ठेवताना आम्हास आनंद होत आहे. अनेकांनी स्वतंत्र ग्रंथ आणि गौरवग्रंथांचीही निर्मिती केली. मग ह्या गौरवग्रंथाची आवश्यकता आणि वेगळेपणा काय? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सदर प्रश्नाचे उत्तर हा संपूर्ण ग्रंथ वाचल्यानंतर आपोआपच मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.