नमस्कार मित्रहो,
नेटभेट तर्फे आम्ही घेउन येत आहोत एक पुर्णपणे मोफत मराठी ऑनलाइन कोर्स. या कोर्स मध्ये मी सलिल सुधाकर चौधरी तुम्हाला सांगणार आहे "युट्युबच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?"
युट्युबने केव्हाच टीव्हीची जागा घेतली आहे. गुगल पाठोपाठ दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे "सर्च ईंजीन" असलेल्या या साईटवर लोक विविध विषयांवरील व्हीडीओ शोधत असतात आणि तासंतास ते व्हीडीओ पाहत असतात. तुम्हीही कदाचित हे करत असाल.
परंतु मित्रांनो, युट्युब मध्ये व्हीडीओ पाहण्यात केवळ वेळ न घालवता तुम्ही स्वतः व्हीडीओ बनवून त्यापासून पैसे कमावू शकता. आपली आवड जोपासत पैसे कमावण्याचा हा राजमार्ग आहे. आणि या राजमार्गावरून कसे चालायचे हे मी तुम्हाला या कोर्स मध्ये सांगणार आहे.