सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने
आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल
उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ
६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या
प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत . कमी
खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ
झालेली आहे.
देशात सोयाबीनची उत्पादकता (१०० किलो/हेक्टर) निम्मी आहे. जनावरांसाठी आणि
कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो .
याशिवाय सोयाबीनपासून सोयामिल्क ,सोया बिस्कीट ,सोयावाडीसारखे १०० च्या वर वेगवेगळे
उपपदार्थ तयार करता येतात . सोयाबीन झाडाच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणूच्या
गाठीद्वारे हेक्टरी १०० किलोपर्यंत नत्र जमिनीत स्थिर होते. तसेच जमिनीतील सेंद्रिय
पदार्थांचे प्रमाण वाढल्याने सोयाबीनचा बेवड म्हणून चांगला उपयोग होतो. सोयाबीनच्या
झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
सोयाबीनला निसर्गाने मानवाला दिलेली देणगी संबोधले जाते . तर पाश्चात्य देशामध्ये या
पिकास कामधेनु तर चीनमध्ये मातीतील सोने म्हणून संबोधले जाते.
सोयाबीनची कमी उत्पाद्कता असण्याची प्रमुख कारणे…
आधुनिक लगवड़ तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे
सुधारीत जातींचा वापर न करणे
दर हेक्टरी झाडांचीसंख्या न राखणे
बीजाक्रिया न करण, उगवणशक्तीची तपसणीं न करणे
योग्य खत मात्रांचा शिफारशीनुसार वापर नकरणे
तण तसेच कीड व रोगांचा बंदोबस्त वेळेवर न करणे
आंतरपीक पद्धतींचा वापर न करणे
सोयाबीनच्या उत्पाद्न वाढीसाठी महत्वाच्या बाबीजमीन
उमध्यम ते भारी , चांगला निचरा होणारी , गालाची जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी
उत्तम असते . हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते . ज्या जमिनीत पाणी साठून
राहते. त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही. जमिनीचा सामू ६ ते ६.५ च्या
आसपास आणि विद्युतवाहकता ४.० डेसी सायमन / मीटरपेक्षा कमी असल्यास अशा जमिनीत
सोयाबीनचे पिक उत्तम येते .
सोयाबीन हवामान
उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. तापमान १८ ते ३५ अंश से.ग्रे. मध्ये पिकाची वाढ
चांगली होते. मुख्यत्वे सोयाबीन खरीप हंगामात घेतले जाते. या पिकास वार्षिक ६०० ते १०००
मी.मी. पर्जन्यमानाची आवश्यकता असते. सोयाबीनची उगवणशक्ती साठवणुकीमध्ये कमी होत जाते. त्यापुळे एक वर्षाच्यावर साठवणूककेलेले
बियाणे उगवणशक्ती तपासल्याशिवायपेरणीस वापरू नये.
कडक उन्हात बियाणे वाळवून साठवल्यास उगवणशक्तीकमी होते.
मळणीयंत्राची गती ४००. आर.पी.ए. च्यावर असल्यास बीयातील अंकुरास धक्का लागतो व
त्याचा परिणाम उगवणशक्तीवर होतो.
साठवणुकींमध्ये पाोत्यांची एकमेकांवर थप्पी लावल्यास खालच्या पोत्यातील बियाण्यांची
उगवणशक्ती कमी होते .म्हणून जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी असावी .
कालावधी – खतांची मात्रा व वेळेवर पूस असल्यास पिक ९० ते १०० दिवसात तयार होते.
सुधारित वाण
एम.ए.सी.एस.१३,एम.ए.सी.एस.५८ ,एम.ए.सी.एस.१२४
,एम.ए.सी.एस.४५०,एम.ए.सी.एस.११८८,फुले कल्याणी (डी.एस.२२८),फुले अग्रणी
,जे.एस.९३-०५ ,जे.एस ९७-५२ , जे.एस ९५-६० ,एन.सी.आर ३७ एम.ए.यु.एस.-४७ ,
एम.ए.यु.एस.-६१,एम.ए.यु.एस.६१-२, एम.ए.यु.एस.-७१,एम.ए.यु.एस.-८१,
एम.ए.यु.एस.-१५८,जे.एस.३३५, टीए.एम.एस.९८-२१
बियाणे प्रमाणे – सोयाबीनची उगवणशक्ती ७० टक्केच्यावर असल्यास हेक्टरी ७५ किलो बियाणे
वापरावे.
बीजप्रक्रिया
उग्वणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा
बुरशीनाश्कांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्व प्रती किलो बियाण्यास ३
ग्रम थायरम किंवा २ ग्रॅम थायरम २.५ ग्रॅम बाविस्टीन व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या
प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद
विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया
करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या
हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविकखताची
बीजप्रक्रिया करावी.
पेरणी
सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे त्यासाठी
वाफशावर पेरणी करावी तसेच पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावे.
पेरणी १५ जून ते १५ जुले दरम्यान करावी. पेरणी ४५ x ५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणी
करताना बियाणे ३-५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी.