इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांसाठी पहिली मराठी इंग्रजी प्रश्नसंच या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. या ॲपमध्ये मराठी आणि इंग्रजी या पुस्तकातील सर्व चित्रांचा समावेश आहे. या चित्रांवर आधारित चित्र ओळखा असे प्रश्न निर्माण केले गेल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवताना सचित्र कोणते आहे ते लक्षात येईल. मराठी विषयांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरांचा क्रम, अक्षरे जुळवून शब्द बनवणे, त्यांच्या वयोगटानुसार त्यांना माहित असणारे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द ,नातेसंबंध, व्यावसायिक इत्यादी विषयावर आधारित प्रश्न तयार केले गेलेले आहेत.
इंग्रजी विषयांमध्ये Rhyming words, Capital to small letters, General knowledge, Fill in the blank चित्र ओळखा अशा पद्धतीचे प्रश्न दिले गेलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना हसत-खेळत मराठी आणि इंग्रजी विषयांचा अभ्यास करता येईल.