कुंभार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व प्रबोधनासाठी कै. बाबुराव भुजंगराव साळवी यांनी "कुंभश्री" ची स्थापना १९९४ साली केली. संस्थापक कै. बाबुराव साळवी यांच्या पश्चातसुध्दा सर्व समाज बांधवांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे व प्रचंड उत्साहामुळे आम्ही यशस्वीपणे व मोठ्या कष्टाने "कुंभश्री" रुपी दीप तेवत ठेवला आहे. कुंभश्रीतर्फे आखिल महाराष्ट्र पातळीवर खालील समाजोपयोगी कार्यक्रम दरवर्षी राबविले जातात.
१) वधु-वर सुचक उपक्रम
२) गुणगौरव शिष्यवृत्ती उपक्रम
३) गरीब विध्यार्थांना सहाय्य
४) कुंभश्री मासिक
५) राष्ट्रीय / नैसर्गिक आपत्तीमधील मदतकार्य