निखिल उल्हास भगत ( जन्म : १२ ओक्टोबर १९८५ )रोजी तळेगाव इथे झाला. वडिलोपार्जित बांधकाम व्यवसायाची काम धरत गृहनिर्माण प्रकल्पाला लागणारे सर्व साहित्य पुरविणारा गौरव हार्डवेअर हा व्यवसाय त्यांनी सुरु केला. वयाच्या १८ व्या वर्षी व्यवसायात उतरलेल्या या युवा उद्योजकाने आपल्या राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा २३ जानेवारी २०२० रोजी केला. जनसेवा विकास समितीसह तळेगावातील सर्वपक्षीय पाठिंब्याच्या जोरावर यशवंतनगर प्रभाग १ मधून बिनविरोध निवडून येऊन आपला संकल्प मांडला