हिंदुजननायक माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे कार्य आणि काम प्रत्येक महाराष्ट्र सैनिक तसेच सर्वसामान्य जनता यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने कनेक्ट म. न. से (Connect Manase) मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.
म. न. से (Connect Manase) या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला तुमच्या विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते काय काम सर्वसामान्य जनतेसाठी करत आहेत याची तुम्हाला माहिती न्यूज आर्टिकल, व्हिडिओ तसेच फोटोज् यांच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. याशिवाय तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय काम व कार्य करत आहे हे तुम्हाला महाराष्ट्र अपडेट या सेक्शन मध्ये माहिती भेटेल.
हिंदुजननायक माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांचा आदेश तसेच पक्षाचे मुख्य नेते यांचे विचार देखील तुम्हाला लीडर्स अपडेट या सेक्शन मध्ये पहायला भेटेल.
म. न. से (Connect Manase) या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये शिक्षित आणि बेरोजगार तरुणांना देखील लाभ होणार आहे कारण या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये आपण जिथे जिथे जॉब वेकेन्सी (म. न. से (Connect Manase) यांच्या माहितीनुसार फक्त) आहेत त्याची अपडेट्स आपणास जॉब अपडेट या सेक्शन मध्ये मिळेल.
आपण बघितलेच असेल की, आपली सर्वसामान्य जनता ही आपल्या "महाराष्ट्र नवनिर्माण सेना" पक्षाला मत न देता दुसऱ्या पक्षाला मत देतात परंतु जेंव्हा जेंव्हा सर्वसामान्य जनता कोणत्याही अडचणीत सापडते तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांना आपले साहेब मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण येते आणि ते हक्काने मनसे पक्षाकडे न्याय मागण्यासाठी येतात, मा. राजसाहेब देखील त्यांना कोणताही लोभ किंवा अपेक्षा न ठेवता त्यांची मदत करतात आणि हेच लक्षात घेऊन यामध्ये कंप्लेंट बॉक्स या सेक्शन ची निर्मिती केली आहे.
म. न. से (Connect Manase) हे मोबाईल ॲप्लिकेशन पक्षाचे अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन नाही. सदरचे मोबाईल ॲप्लिकेशन मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या सदैव एकनिष्ठ महाराष्ट्र सैनिक यांच्या मार्फत बनविले आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनचे एकच उद्दीष्ट आहे की माझे राजसाहेब आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे जनतेसाठी आणि महाराष्ट्रासाठी काय काम करत आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचावे.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे