भारताचे पंतप्रधान हे भारत देशामधील केंद्रीय सरकारचे प्रमुख व देशाच्या राष्ट्रपतीचे प्रमुख सल्लागार आहेत. पंतप्रधान, भारताच्या मंत्रीमंडळाचा व संसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचा नेता आहे. भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा तो प्रमुख आहे. पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभा व राज्यसभा ह्या दोन भवनांपैकी एकाचा सदस्य असणे बंधनकारक आहे.