डॉ. सुहास पेठे तथा श्री पेठेकाका हे महाराष्ट्रातील सातारा येथे वास्तव्यास असणारे एक तत्त्वज्ञ संत आहेत. माणूस, सृष्टी यांची दु:खे व त्यांचा निरास - हे श्री काकांच्या कार्याचे केंद्रबिंदू असून, आपल्या विविधांगी व्यासंगाचा त्यांनी अगणित व्यक्तींना विनामूल्य लाभ आजन्म करून दिला आहे. या ॲपमध्ये श्री काकांनी संकलित केलेले विविध संतांचे अभंग आणि श्री काकांनी स्वतः लिहिलेले अभंग, आरत्या, श्लोक, विविध नित्यपाठ, चिंतने, ७५ पुस्तके व इतर प्रासंगिक रचनांचा समावेश आहे. या सर्व रचनांना श्री काकांनी अतिशय भावपूर्ण चाली दिल्या असून गेली सुमारे पस्तीस वर्षे जिज्ञासू साधक त्यांचा वैयक्तिक उपासनेसाठी व साधनेकरिता अभ्यासासाठी म्हणून उपयोग करीत आहेत. श्री काकांचे हे नि:स्वार्थकार्य शांतपणे तेवणाऱ्या "नंदादीपा"प्रमाणे अविरत चालू असून त्या प्रकाशात आजवर अनेक साधकांचे जीवनपथ उजळून निघाले आहेत.