धनगर ही एक आदिम जमात आहे. डोंगर दर्यात राहणारी ही जमात आपली स्वतंत्र संस्कृती जतन करीत आहे. लोककलांपासून लोकसाहित्यापर्यंत स्वतःचा समृद्ध या जमातीने जातं केला आहे. धनगरी ओव्यांच्या मौखिक परंपरेपासून ते आज लेखन करणाऱ्या अनेक नवोदित लेखकांपर्यंत ही साहित्य परंपरा अखंडित सुरु आहे. या सर्व साहित्याचे तटस्थ मूल्यमापन करण्यासाठी तसेच धनगर जमातीच्या अंगाने जी काही अक्षरऊर्जा तयार झाली आहे, त्या ऊर्जेचे संवर्धन करण्यासाठी, धनगर जमातीच्या प्रश्नांचा अचूक वेध घेण्यासाठी आणि उत्तरे शोधण्यासाठी साहित्य संमेलन हे एकमेव वैचारिक पीठ आहे.
चला, या संमेलनात सहभाग नोंदवून धनगरांच्या आधुनिक क्रांतीचे अग्रदूत बना!! नवविचारांचे पाईक बना!!