नवोदय प्रवेश परीक्षेत मानसिक क्षमता चाचणी , गणित , भाषा या तीन
विषयांची चाचणी घेतली जाते. विद्यार्थ्यांना या महत्वाच्या परीक्षेची नीट तयारी करता यावी यासाठी या app मध्ये मानसिक क्षमता चाचणी , गणित , भाषा या विषयांचे भरपूर प्रश्न देण्यात आले आहेत
App ची वैशिष्ट्ये :
● सदर अँप मध्ये आपण मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेत सराव करू शकताय.
● प्रत्येक घटकावर लेव्हल नुसार भरपूर प्रश्नांची तयारी
● येथील प्रश्नांच्या सरावाने 2018 पासून भरपूर विदयार्थी नवोदय व शिष्यवृत्तीस पात्र ठरले.
● प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरण उत्तरे
● कठीण वाटणारे प्रश्नांची वेगळी यादी निर्माण करून जास्त सरावाची सुविधा.
● निःशुल्क वापरात येणारे अँप
● सदर अॅप्लिकेशन पालक व शिक्षकांसाठी सुद्धा खूप उपयोगाचे आहे.
... तर नक्की डाऊनलोड करा आणि इतरानाही शेअर करा.
Join Us :
Youtube Channel : https://www.youtube.com/channel/UCx0yQbUiZBayE4LubtFXPHQ/
Website : https://sanskarmaths.in/
facebook Page : @SanskarMathsClub
Teligram : t.me/SanskarMathsClub
नवोदय विद्यालयाबद्दल थोडक्यात माहिती -
• प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते
• ग्रामीण भागातील विद्यार्थी 60% व शहरी भागातील 40% विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
• SC / ST / OPEN आरक्षण आहे.
• निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे *संपूर्ण मोफत शिक्षण NCERT BOARD प्रमाणे असते* .
▪️ *परीक्षा*
• परीक्षा प्रत्येक तालुकास्तराव होते.
• प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या दुसरा शनिवारी ही परीक्षा असते.
• एकूण गुण - 100
• एकूण प्रश्न संख्या - 80
• प्रत्येक प्रश्न - 1.25 गुणासाठी.
• परीक्षा वेळ - 2 तास.
▪️ विषय व गुण
• मानसिक क्षमता - 40 प्रश्न
"10 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नात 4 उपप्रश्न असतात."
• अंकगणित - 20 प्रश्न
"एकूण 15 घटक आहेत . काठिण्यपातळीत थोडी वाढ करण्यात आली आहे."
• मराठी / प्रथम भाषा. - 20 प्रश्न
"एकूण 4 उतारे असतात. प्रत्येक उतारावरील 5 प्रश्न विचारली जातात."
▪️ अभ्यास कसा करावा?
1) मानसिक क्षमता चाचणी
संपूर्ण 40 प्रश्न आकृत्या वरील आधारीत असून जास्तीतजास्त सराव करणे गरजेचा आहे. विद्यार्थ्यांना 40 पैकी 40 गुण मिळवता येतात.
2) अंकगणित
"15 ते 16 घटक असून गणितात पैकी च्या पैकी गुण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आवश्यक आहे"
2019 व 2020 चे झालेले पेपर्स पहा.
काठिण्य पातळी लक्षात घेऊन तशा प्रश्नचा सराव करून घ्यावे .
3) भाषा
" एकूण 4 उतारे असून या साठी आपणास जास्तीत जास्त वाचन ...उतारे...लेख...नविनविन बालसाहित्य लेख. वाचन करणे आवश्यक आहे ".
विद्यार्थ्यांचे समानार्थी शब्द / विरूद्धार्थी शब्द व शब्द संपत्ती चांगली असेल तर 20 पैकी 20 गुण सहज मिळवता येतात.
▪️ किती गुण आवश्यक आहेत निवड होण्यासाठी
- बुद्धिमत्ता 40 प्रश्न बरोबर यावे
- मराठीत 20 प्रश्न यावे.
- गणित 18 प्रश्न बरोबर ...
म्हणजे आपली निवड निश्चित समजा.
80 प्रश्न पैकी किमाण 76 प्रश्न बरोबर आले तरच निवड निश्चित.