सप्रेम नमस्कार
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील कायदेशीर व अग्रगण्य अराजकीय असे सरपंचांचे हक्काचे व्यासपीठ आहे सरपंच व ग्रामपंचायतीचे हीत, न्याय-अन्याय, हक्क अधिकारावर गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. गावात काम करत असताना सरपंच व ग्रामपंचायत पुढे अनंत अडचणी असतात त्याची संघटित पणे सोडवणूक व्हावी या उद्देशाने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रची स्थापना केलेली आहे. ग्रामपंचायत शिपाई पासून राज्याच्या सचिवा पर्यंत सर्व संघटित आहेत आता यापुढे आपल्याला संघटित झाल्या शिवाय पर्याय नाही संघटित झाल्यावर अनेक प्रश्न मार्गी लागतात असा आमचा संघटित जिल्ह्याचा व तालुक्याचा अनुभव आहे अतिशय सक्षम प्रदेश कार्यकारिणी असून सातत्याने आम्ही सरकार दरबारी किंवा सरकारने न्याय दिला नाही तर न्यायालयातून आपल्या हक्क अधिकारावर भांडत असतो, सरकार व न्यायालयातुन अनेक निर्णय सरपंचांच्या पदरी देण्यास आम्ही यशस्वी झालो आहोत, अनेक चुकीच्या निर्णयावर आपल्याला शासन आणि न्यायालयात खंबीर पणे उभे राहणे गरजेचे आहे. आपण कोणत्याही पक्ष पार्टी व सरकार बरोबर किंवा विरोधात नाही, राज्यातील सर्व पक्ष पार्टी जाती धर्माना सामावुन घेत कार्य करत आहोत, ग्रामपंचायतच्या संदर्भात शासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णया विरोधात न्याय मागण्याची भूमिका कायम ठेवलेली आहे सरपंच व ग्रामपंचायतींना भविष्यात उचित मान सन्मान मिळावा सक्षम सरपंच आणि ग्रामपंचायती महात्मा गांधीजीचे स्वप्न साकार करतील असा आम्हाला विस्वास आहे आमच्यातील आदर्श सरपंच नेतृत्व आणि ग्रामपंचायतीची कामे राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचवणे हाही सरपंच परिषदेचा उद्देश आहे चला मित्रानो आपण संघटित होऊन संघर्षासाठी एकमेकांचे हात हातात घेऊन सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र बरोबर संलग्न राहून, सरपंच परिषदेचे अधिकृत सदश होऊन सरपंच परिषदेचे हात बळकट करुया
धन्यवाद
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ( प्रदेश )