|| ओम नमो नारायण ||
प्रिय दशनामी बंधू भगिनींनो ,
आपण सर्वांनी सामाजिक पातळीवर एकत्र येण्यासाठी आम्ही हे अॅप तयार केले आहे.
संगमनेर तालुक्यातील दशनाम गोसावी समाज बांधवाना विनंती करण्यात येते की ,
या अॅप मधील सदस्य नोंदणी मध्ये जाऊन आपली माहिती नोंदवावी. जेणेकरून तालुक्यातील इतर गावातील लोकांना आपल्याशी संपर्क करणे सोपे होईल. यातून सर्व गोसावी समाजाची वेब डिरेक्टरी तयार होत आहे. तरी आपल्या तालुक्यातील आपल्या नातेवाईकांची माहिती भरावी. यामुळे तालुक्यातील गोसावी समाज एका ठिकाणी एकवटला जाणार आहे. शुभ - अशुभ प्रसंगी आपल्याला आपल्या नातेवाईकांशी संपर्क करण्यासाठी या डिरेक्टरीचा उपयोग होणार आहे.
आपल्या काही तक्रारी अथवा सूचना असतील तर आपण त्या अॅप मधून आम्हाला पाठवू शकता त्यांचे आम्ही स्वागत करू आणि आपणास मार्गदर्शन अथवा मदत करण्याचा प्रयत्न करू.
आपण सर्वांनी या समाजबांधणीच्या कामाला आपण हातभार लावावा ही विनंती.