आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे.या देशातील बहुतांश लोक हे गावात राहतात आणि शेती करतात.आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे. गावातील शेतकरी दिन – रात मेहनत करून शेतीची कामे करतो, पिके उगवतो आणि संपूर्ण मानवतेचे पोषण करतात. म्हणून या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानला जातो. शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस,ओला दुष्काळ,कोरडा दुष्काळ,बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत,निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो,हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला दरवेळी फळ मिळतेच असे नाही. तसेच शेतकऱ्यांसमोर हमीभावाची ही समस्या आहे. शेतातला माल शेतातच वाया जात आहे.दलाल किंवा व्यापारी योग्य भाव न देत असल्याने शेतकऱ्यांन त्यांचा योग्य भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत देखील शेतकरी आपल्या बरोबर त्याच्या ही घराची जवाबदारी पार करण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी परिस्थितीला शेतकरी सुद्धा हातबल होतो. बँकेच, सावकाराच कर्जा डोक्यावर ढोलत असत, आशात कुटुंबाची जवाबदारी,मुलांनच शिक्षण, त्यांची लग्न तो पुर्ण न करु शकल्यामुळे त्याला शेवटी आत्महत्या शिवाय परीया उरत नाही.
हे सार पाहून आपण आपल्या समाज्याचे या शेतकऱ्याच काहीतरी देण लागतो हे समजून आम्ही ‘मी शेतकरी’मिळुन सरळ शेतकऱ्यांनाच्या शेतात जाऊन त्यांच्या कडे पिकवलेला भाजीपाला,फळे सरळ आणि योग्य भावाने तुमच्या घरा पर्यत, सोसायटी पर्यंत पोहोचवण्याच काम सातत्याने करीत आहोत. या मध्ये शेतकऱ्यांचा माला वाया जात नाही,शेतकऱ्यांला दलाल किंवा व्यापाऱ्याकडे पैसे साठी वाट पाहायला लागत नाही. या मागे आमचा उद्देश एकच की शेतकऱ्याला त्याचा कष्टाचा, घामाचा मोबदला जाग्यावर मिळावा. आज आम्ही काही हजारो हून अधिक घरामध्ये ताजी भाजी व फळे पोहोचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, आपण दाखवत असलेल्या विश्वास व प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. आपल्या सर्वांचा प्रतिसाद व मागणी नुसार आम्ही भाजीपाला व फळे यांच्या विक्रीसाठी आम्ही ‘मी शेतकरी’नावाचा ऑन लाईन अँप्लिकेशन या उद्देशानेच सूरु केले आहे, त्यामुळे आता तुम्ही घरी बसल्या बसल्या भाजीपाल्यासोबत ताज्या फळांचाही तुम्हाला गरजेनुसार हवी ती भाजी व फळे ऑर्डर करता येऊ शकतील व त्याचा स्वाद घेता येईल.
एक हाथ मदतीचा आपला पोशिंदा शेतकऱ्यासाठी.
‘मी शेतकरी’