ग्रेप लाईन कन्सल्टन्सी ऍप हे खास द्राक्ष बागायतदारांना निर्यातक्षम द्राक्ष निर्मितीसाठी मार्गदर्शन करणारे ऍप आहे .या ऍप द्वारे बागायतदारांना त्यांनी नोंद केलेल्या द्राक्ष बाग छाटणी तारखेनुसार व हवामान अंदाजानुसार औषध फवारणी नियोजन उपलब्ध केले जाते . या ऍपच्या माध्यमातून योग्य शास्त्रीय पद्धतीने केलेल्या माती व पाणी परीक्षण अहवालानुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन मार्गदर्शन दिले जाते . द्राक्ष बागायतदार त्यांचे प्रश्न ,अडचणीचे समाधान कारक तसेच निर्यातक्षम द्राक्ष निर्मितीसाठी योग्य मार्गदर्शन या ऍपच्या सेवेमधून प्राप्त करू शकतात.