पावस येथील स्वामी स्वरूपानंद हे नाथ संप्रदायातील आधुनिक संतच होत. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भावार्थ दीपिकेचा अर्थ सामान्य जनांना कळवा, म्ह्णून स्वामींनी रचलेला अभंग ज्ञानेश्वरी हा ग्रंथ साधकांसाठी आदर्श वस्तुपाठ आहे. केवळ, वाचन नाही तर या ग्रंथातील प्रत्येक ओवी समजून ती आचरणात आणणे आवश्यक आहे व त्यासाठी या ग्रंथाचे सर्वांगीण अध्ययन करणे महत्वाचे आहे. यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे.
या अध्ययनासाठी अभंग ज्ञानेश्वरीतील १८ अध्याय हा अभ्यासक्रम आहे. प्रत्येक अध्यायावरील विवेचन ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात करण्यात आले आहे. तसेच रोज प्रश्नोत्तरे विचारण्यात येणार आहेत. अभंग ज्ञानेश्वरी मधील ज्या भागावर ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत त्या ओव्या देखील देण्यात येणार आहेत.