नागरिकांना पात्र ठरू शकणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती व्यक्तिअनुरुप स्वरुपात उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘महा योजना’ या अॅप निर्मिती करण्यात आलेली आहे. नागरिकांनी गरजेनुसार दिलेल्या माहितीवरून ते कुठल्या योजनांना पात्र ठरू शकतात हे दाखविणारे ‘महा योजना’ एक अनोखे अॅप आहे. या अॅप वर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल.
योजनेचा उद्देश व मिळणारे लाभ, शासन निर्णय, विहित नमुन्यातील अर्ज, जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, संपर्कासाठी संबंधित अधिकारी अशा अनेक बाबींची माहिती येथे देण्यात आलेली आहे. नागरिक गरजेप्रमाणे, त्यांना हवे असणारे लाभ आणि त्यानुसार योजनांची निवड करतील. त्या योजनांसाठी आवश्यक तेथे माहिती भरून नागरिकांना व्यक्तिगतरीत्या ते त्यातील कोणत्या योजनांना संभाव्य पात्र ठरू शकतात हे दाखविले जाईल.
महा योजना’ अॅप च्या माधमातून जास्तीत जास्त गरजू नागरिकांन पर्यंत माहिती पोहचवून समृद्धी घडविणे हाच उद्देश आहे.
Maha Yojana is not the application provided by Government of India. But we have gathered the data from the official Government websites. For the reference, we have used below Government websites.
1. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
2. http://mr.vikaspedia.in/
We will continuously update the data and will try to make it simpler for the user to have information about the documents and other licensing act details.
Do like us and share the your comments as this will help to make improvements and squash bugs from the app.