महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया म्हणून सर्व परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील निफाड या तालुक्याच्या गावी असलेली आमची आय. एस. ओ. मानांकित जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निफाड नं १ शाळा म्हणजे निफाड शहराची ज्ञानवाहीनी.
आमच्या शाळेची स्थापना 1 जानेवारी 1857 रोजी झाली.
आज शाळा आपला 162 वा स्थापना वर्धापन दिन साजरा करत असतांना शाळेने अनेक स्वातंत्र्यवीर; डॉक्टर; वैज्ञानिक; शिक्षणतज्ज्ञ ;समाजसेवक घडविले आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आज शाळा संपूर्ण डिजिटल व इ लर्निग युक्त झाली असून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत असलेली शाळेत सातवी वर्ग वाढलेले आहे.
शाळेचे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यस्तरावर चमकले आहेत. नुकतेच शाळेची विद्यार्थिनी लावंण्या निलेश शिंदे हिचा राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेत महाराष्ट्र राज्यात सहावा क्रमांक आल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शाळेच्या मुकुटात शिरपेच चढला तो आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री निलेश विनायक शिंदे सर यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक 5 सप्टेंबर 2018 रोजी मिळाला तेव्हा श्री निलेश शिंदे सरांचे कार्यकर्तृत्व बघून याच दिवशी नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांनी देखील सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले.
अशा या निफाडच्या ज्ञानवाहीनी अर्थात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निफाड नं १ शाळेविषयी थोडेसे.......