श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.
श्रीक्षेत्र थेऊर गाव हे मुळा-मुठा नदींने वेढलेले आहे. पुण्यापासून 20 कि.मी.अंतरावर असून, पुणे-सोलापूर महामार्गावर आहे. लोणी-काळभोर गावापासून फक्त 7 कि.मी. अंतरावर श्रीक्षेत्र थेऊरगाव आहे.
सौजन्य :- अष्टविनायक प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र थेऊर. ता हवेली, जि पुणे