दालचिनी लागवड जून, जुलै महिन्यात तयार केलेल्या खड्ड्यांच्या मध्यभागी दालचिनीची रोपे किंवा कलम लावावे. लागवड केल्या नंतर पावसाचे पाणी बुंध्यात साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
हवामान व जमीन
दालचिनी हे उष्ण कटिबंधातील झाड आहे. उष्ण व दमट हवामान या झाडास चांगले मानवते. या हवामानामुळे झाडाची वाढ व सालीची प्रत (दालचिनीची प्रत) चांगली राहते. या झाडास दिवसाचे सरासरी तपमान २७ अंश से. ग्रे. असणे आवश्यक असते. १० अंश से. ग्रे. खाली तर ३५ अंश से. ग्रे. वर तापमान हे या पिकास हानिकारक ठरते. २००० ते २५०० मि. मी. पाऊस व त्याची व्यवस्थित विभागणी महत्वाची आहे. या झाडाला देखील विरळ सावलीची आवश्यकता असते. त्यामुळे नारळ, सुपारीच्या बागेतही हे पीक घेऊ शकतो. परंतु अति सावलीमुळे दालचिनीची प्रत बिघडते आणि झाड देखील कीड रोगास बळी पडते. मध्यम प्रतीच्या हवामंत ह्या पिकाची लागवड स्वतंत्रपणे उघड्या जमिनीवर देखील करता येते.
इतर मसाला पिकांपेक्षा हे पीक कणखर असल्यामुळे बहुतेक सर्व जमिनीत चांगले येते. परंतु गाळाची अधिक प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन अधिक मानवते. थोडक्यात ज्या हवामानात नारळ, सुपारी यासारख्या फळझाडांची लागवड होते त्या हवामान हि झाडे अगदी सहजरीत्या येऊ शकते.