डाळिंब पिकाला उष्ण, दीर्घ उन्हाळा, कोरडी हवा व साधारण कडक हिवाळा चांगला मानवतो.
डाळिंब हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत अत्यंत चांगल्या प्रकारे घेता येते. जमिनीत चुनखडीचे प्रमाण अत्यल्प असल्यास झाडांची वाढ चांगली होते. हमखास पाणीपुरवठा असलेली, उत्तम निचऱ्याची, हलक्या ते मध्यम प्रतीची जमीन डाळिंबासाठी निवडावी.
4.5 - 3.0 मीटर अंतर लागवडीसाठी ठेवावे. लागवड कलमांपासूनच करावी. गुटी कलम लावून डाळिंबाची लागवड यशस्वीरीत्या करता येते. लागवडीनंतर सुरवातीची दोन वर्षे बागेत दोन ओळींमध्ये कांदा, काकडी, मूग, चवळी, सोयाबीनसारखी कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत.
डाळिंबाच्या जाती
गणेशया जातीची फळे आकाराने मध्यम असून, बिया मऊ असतात. चव गोड असते.
जी - 137 - या जातीत आतील दाणे मऊ आहेत व रंग गणेशपेक्षा किंचित गडद आहे.
मृदुला
या जातीची फळे आकाराने मध्यम असून, फळांचा रंग व दाण्यांचा रंग गडद लाल असतो. आरक्ता - गोड, टपोरे, मृदू आणि आकर्षक दाणे, तसेच फळांची साल चमकदार, गडद लाल रंगाची आहे.
भगवा - फळे 180-190 दिवसांमध्ये परिपक्व होतात.