कुक्कुट पालन पोल्ट्रीतून आर्थिक प्रगती शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात. घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.गावरान कोंबडीचे मात्र असे नाही. तिला ना औषध लागते ना पाणी. तिची ङ्गारशी निगराणीही करावी लागत नाही. परंतु जसे बाजारात हायब्रिय बियाणांपासून तयार झालेल्या भाज्या आणि धान्यापेक्षा परंपरागत धान्यांना आणि भाज्यांना मागणी असते तशीच अंडी खाणार्यांकडून पिंजर्यातल्या कोंबड्यांपेक्षा गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना जास्त मागणी असते. विशेष म्हणजे गावरान कोंबड्या पाळण्यासाठी ङ्गारसा खर्च करावा लागत नाही. त्यांचीच पिली तयार होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. पिंजर्यातल्या कोंबड्यांच्या बाबतीत मात्र कोंबड्यांची एक पिढी संपली की, नव्याने छोटी छोटी पिली विकत आणावी लागतात. गावरान कोंबड्यांचे पालन किङ्गायतशीर असले तरी जोपर्यंत कोंबड्यांची संख्या दहा-वीस पर्यंत मर्यादित असते तोपर्यंतच मोकाट कोंबडी पालन करता येते. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा झाल्यास मोकाट कोंबडी पालन शक्य होत नाही.
कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर याचा अर्थ काय ? कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.
शाकाहारी अंडे म्हणजे काय?
आहारात अंड्याला ङ्गार महत्त्व आहे. कारण त्यात अनेक पोषण द्रव्ये असतात. अंडी खाण्याची प्रथा आपल्याकडे ङ्गारशी रूढ नसतानाच्या काळात अंड्याचे महत्त्व सांगण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न सरकारने केला. सरकारतर्ङ्गे प्रचाराचे ङ्गलक लावलेले असत. अंडी खाल्ल्याने माणूस शक्तीमान होतो कारण अंड्यात जीवनसत्त्वे विशेषत: जीवनसत्तव ड हे मोठ्या प्रमाणावर असते. लहान मुलांना अंडी खायला दिली पाहिजेत कारण त्यामुळे मुलांचे शरीर बळकट होते. मुले शक्तीमान होतात. म्हणूनच म्हटले जाते, जो खाई अंडे,त्याशी कोण भांडे ?. अंडी खाणार्याशी भांडण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही. असे असले तरीही अंडी हा मांसाहारी प्रकार आहे त्यामुळे शाकाहारी लोक अंडी खात नाहीत. नाही म्हटले तरी भारतात शाकाहारी लोकांचीच संख्या मोठी आहे. त्यामुळे अंड्यांच्या वापराला काही मर्यादा येतात. शाकाहारी लोकांनी अंडी खायला सुरूवात केली तर मात्र अंड्यांना मोठी मागणी येईल आणि अंड्याची किंमत वाढून कांेंबडी पालकांचा ङ्गायदा होईल. शाकाहारी लोकांनीही अंडी खावीत यासाठी अंडी ही शाकाहारी असतात हे सांगण्याचा ङ्गार प्रयत्न झाला पण काही शाकाहारी संघटना आणि काही साधूंंनी शाकाहारी अंडे या संकल्पनेलाच विरोध केला आणि अंडी शाकाहारी असू शकत नाहीत असे सांगायला सुरूवात केली. त्यामुळे शाकाहारी अंडी ही संकल्पना लोकांपर्यंत नीट पोचली नाही