नमस्कार.
प्रिय शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,
आज तंत्रज्ञानाचे युग आहे. त्याचीच प्रचीती आपल्याला शाळाशाळांतूनही येते आहे. आता सर्वच शाळा डीजीटल होत आहेत. पालकही स्मार्ट फोन वापरत आहेत. याच फोनचा अध्ययन - अध्यापनात वापर व्हावा यासाठी आम्ही इयत्तानिहाय पाठ्यपुस्तकांचे अॅप बनविले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारतीने) सर्व इयत्तांच्या पाठयपुस्तकांचे
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx
या लिंक वर Pdf version यापूर्वीच उपलब्ध करून दिलेले आहे.
शिक्षकांना पाठ टाचण काढण्यासाठी, शिकविण्यासाठी, मूल्यमापनासाठी, प्रशिक्षण काळात अभ्यास करण्यासाठी याचा खूप उपयोग होणार आहे.
विद्यार्थ्यांना घरी स्वाध्याय सोडविण्यासाठी तसेच शाळेत टॅब असतील तर तिथे अभ्यासासाठी याचा खूप उपयोग होणार आहे.
मुलांना आता सगळी पुस्तके रोज रोज पाठीवरून घरी आणण्याची गरज नाही. पुस्तके शाळेतच ठेवली तरी चालतील. घरी आपल्या पालकांच्या स्मार्टफोन वरून मुले या अॅपच्या माध्यमातून पाठ्यपुस्तक सहज पाहू शकतील. यातून मुलांचे दप्तराचे ओझे कमी होईल यात शंकाच नाही.
पालकांना अभ्यास घेताना या अॅपचा मोठ्याप्रमाणात उपयोग होणार आहे.
तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींना तर हे अॅप म्हणजे माहितीचा खजिनाच असणार आहे.
मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सोप्या पद्धतीने, सहज हाताळता येईल अशा पद्धतीने हे अॅप तयार केले आहे.