स्ट्रॉबेरी लागवड कशी व कधी करावी
स्ट्रॉबेरीची लागवड उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही हंगामांत करता येते; परंतु महाराष्ट्रातील ऑक्टोबर ते मार्च या कालावधीतील हवामान स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी पोषक आहे.
जमिनीचा प्रकार
स्ट्रॉबेरीचा उत्तम वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी, हलकी, मध्यम काळी, वालुकामय पोयटा, गाळाची जमीन असावी. जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक 5.5 ते 6.5 या दरम्यान योग्य असतो. भुसभुशीत वालुकामय जमिनीत स्ट्रॉबेरीचा रोपांची मुळे जोमाने वाढतात.
हवामान
या पिकासाठी थंड हवामान चांगले मानवते. हिवाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या दिवसात दहा अंश ते 25 अंश सेंटिग्रेड तापमानात स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी होते तसेच उष्ण हवामानात 20 ते 25 अंश सेंटिग्रेड असेल तर फुल तर फुल्ल निर्मिती होऊनफळधारणा दीर्घकाळ चालू राहते. यासाठी जास्त काळ थंडी मिळाली तर उत्तम असते.